कोरेगाव भीमा प्रकरण : NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल

कोरेगाव भीमा प्रकरण : NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल

कोरेगाव भीमा दंगलीच्या हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सोपवण्यात आला असून NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका विशेष पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर केंद्र सरकारने २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएकडे सोपवली आहे. दरम्यान, केंद्र सरकारवर शरद पवार, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री यांनी टीकास्त्र सोडले होते. मात्र, असे असले तरीही हा निर्णय मागे घेण्यात आला नसून आता पुणे पोलीस मुख्यालयात एनआयएचे (NIA) पथक दाखल झाले आहे.

First Published on: January 27, 2020 9:08 PM
Exit mobile version