भुजबळांनी यासाठी राणेंना केला फोन

भुजबळांनी यासाठी राणेंना केला फोन

भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या नारायण राणेंनी मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु-सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. नारायण राणे यांच्या कामाची उंची मोठी मात्र, खाते लघु-सूक्ष्म असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. महाविकास आघाडीचे मंत्री आणि एकेकाळी शिवेसेनेत राणे यांचे सहकारी राहिलेल्या छगन भुजबळ यांनी मात्र राणेंना फोन करत शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या नारायण राणेंना मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु-सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठीच राणेंना मंत्रीपद देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु, शिवसेनेत यावरून टिकाटिप्पणी सुरू आहे. “नारायण राणे यांची उंची खरं पाहायला गेलं तर यापेक्षाही मोठी आहे. त्यांच्या कामाची उंची मोठी पण खाते लघु-सूक्ष्म आहे. राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी असल्याचे सांगत शिवसेनेने जोरदार टोला लगावला आहे. शिवसेनेकडून टिकाटिप्पणी सुरू असताना भुजबळ यांनी राणे यांना शुभेच्छा दिल्या. भुजबळ म्हणाले, मी स्वतः राणे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. राणेंना देण्यात आलेल्या खात्याबाबत ते म्हणाले, कोणतेही खातं कमी किंवा जास्त महत्वाचं नसते तर त्या खात्याचं काम कसे होते यावरून त्या खात्याचे महत्व वाढत असते. त्यामुळे निश्चितच ते चांगलं काम करतील असे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव पाडणारी, वादांची वादळे झेललेली अनेक नावे विविध पक्षात आजवर आपल्यासमोर आली आहेत. शिवसेनेत अशी दोन मोठी नावे होती. एक म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरे म्हणजे नारायण राणे. महाराष्ट्रात घडलेल्या 1991 च्या राजकीय नाट्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि विधीमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार नारायण राणेंकडे चालून आली होती.

First Published on: July 9, 2021 8:17 PM
Exit mobile version