Big Breaking : नीलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती; ट्वीट करत केली घोषणा

Big Breaking : नीलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती; ट्वीट करत केली घोषणा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. ट्वीटर या सोशल मीडिया हँडलवरून ट्वीट करत त्यांनी ही घोषणा केली आहे. राजकारणात मन रमत नसल्याचं नीलेश राणे यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटलं आहे.  (Big Breaking Nilesh Rane s retirement from politics The announcement was made by tweeting)

नीलेश राणेंचं ट्वीट काय? 

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

नीलेश राणे यांनी इतर कोणंतही कारण न सांगता, तसंच कोणालाही दोष न देता फक्त राजकारणात मन रमत नसल्याचं म्हणत त्यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीमागे नेमकं कारण काय? यावर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

(हेही वाचा: दसरा मेळाव्याआधी ठाकरेंना मोठा धक्का; माजी नगरसेवक विलास चावरींचा शिंदे गटात प्रवेश )

First Published on: October 24, 2023 12:58 PM
Exit mobile version