पुणेकरांना दिलासा; पिंपरी चिंचवड शहरातच होणार कोरोनाची चाचणी

पुणेकरांना दिलासा; पिंपरी चिंचवड शहरातच होणार कोरोनाची चाचणी

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र अशा परिस्थितीत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. यापुढे पिंपरीतील कोरोना संशयितांचे रिपोर्ट पुण्यात न पाठवता त्यांची तपासणी पिंपरीतील भोसरी परिसरात असलेल्या नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) मध्येच केली जाणार असून आद्याप कोरोनाची चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी NARI मध्ये covid-19 चाचणी करण्यासंदर्भात पाठपुरवा केला होता, अखेर या संस्थेत कोरोना चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे.

पुण्यातील NIV या संस्थेकडे कोरोना संशयित व्यक्तींच्या चाचणीचे रिपोर्ट येण्यासाठी साधारण २० तासांहून अधिक कालावधी लागत होता. त्यामुळे कोरोना संशयित व्यक्तीला आपला रिपोर्ट निगेटिव्ह येणार की पॉझिटिव्ह यासंदर्भात व्यक्तीला चिंता असायची मात्र आता कोरोना चाचणीचे अहवाल कमी कालावधीत उपलब्ध होणार असल्याने वैद्यकीय यंत्रणेवरील ताण कमी होऊन इतर कोरोना बाधितांवर उपचाराची आणि शहरातील संशयित व्यक्तींच्या चाचण्या घेण्याच्या क्षमतेत देखील वाढ होणार आहे.


कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचं रक्त विकलं जातंय १० लाख प्रति लिटर!
First Published on: May 2, 2020 3:52 PM
Exit mobile version