भाजपा हे लुटारु, दरोडेखोर सरकार- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भाजपा हे लुटारु, दरोडेखोर सरकार- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार, नाना पटोलेंची माहिती

जागतिक बाजारपेठेत कच्चा तेल्याच्या किमती कमी असतानाही केंद्रातील मोदी आणि भाजपा हे लुटारु दरोडेखोर सरकार जनतेची लूट करत असल्याची गंभीर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत नाना पटोले बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी देशात वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवरुन भाजपा सरकारवर निशाला साधला आहे. यावेळी बोलताना पटोले म्हणाले, ‘पेट्रोल डिझेलची दरवाढ एक महिन्यात ७ ते ८ रुपये झाली. केंद्रातील आणि राज्यातील भाजपाचे नेते सांगतात की, प्रत्येक राज्याने आपला टॅक्स कमी करावा म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील. २०१४ मध्ये रोड टेव्हलपमेंटने पेट्रोल, डिझेलवर १ रुपये टॅक्स घेऊन रस्ते चांगले करण्याचे काम सुरु केले होते. मात्र मोदींचे सरकार आल्यानंतर आपल्या राज्याचे विकास पुरुष आणि केंद्रातील मंत्री यांनी रस्ते विकासाच्या नावाने झपाटा सुरु केला.

आता १ रुपयाच्या जागी १८ रुपयाचा टॅक्स घेण्याचे काम सुरु झाले आहे. केंद्र सरकराने जी काही बजेट प्रोव्हिजन आणली पेट्रोल डिझेवर जे काही सेस लावले त्यामध्ये राज्याला याचा वाटा मिळू नये यासाठी प्रयत्न केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नावाने पेट्रोल डिझेलच्या चार रुपये घेऊन शेतकऱ्यांची थट्टा आणि बदनाम करण्याचं काम करत आहे. असेही ते म्हणाले. राज्य सरकारने टॅक्सचे भाव वाढवले म्हणून पेट्रोल डिझेलचे भाव वाढते. २०१९ पर्यंत फडणवीस सरकारच्या काळात पेट्रोल डिझेलमध्ये ११ रुपयांची वाढ केली. आमच्या सरकारने १ रुपये टॅक्स ठेवला. त्यामुळे भाजपा सरकारने टीका करण्याआधी वस्तुस्थिती जाणुन घ्यावी. हा जो सेश आहे त्यात आपण एक रुपया घेतो. मात्र केंद्र सरकाराने सुरु केलेल्या लुटारुपणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी भाजपाच्या तज्ञांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन चर्चासत्र भरवावे असेही ते म्हणाले.

सरकारी कंपन्या विकायाचे कारस्थान भाजपा सरकार करतयं

तसेच भाजपा सरकारमध्ये सार्वजनिक कंपन्याचे होत असलेले खाजगीकरण यावरही त्यांनी भाष्य केले. सरकारी कंपन्यांना डुबवू त्यांना विकायला काढायची व्यवस्था भाजपा सरकार करत आहे. सर्व सरकारी कंपन्या परस्पर विकल्या जात आहे. राज्यसभेत कोणताही चर्चा न करता सरकारी कंपन्या विकायाचे कारस्थान भाजपा सरकार करत आहे. संसदीय परंपरा मोडीत काढत आहे. म्हणून भाजपा आता राज्यांना पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी राज्याने टॅक्स कमी करावा असे सांगत आहे परंतु भाजपाने काय केले ते सांगावे. त्यामुळे या दरवाढीमागे नेमके कोण आहे हे जनतेलाही खरे समजेल. काँग्रेसने देशामध्ये सार्वजनिक क्षेत्र उभे केले मात्र भाजपा ते विकत आहे. सार्वजिनक क्षेत्र विकणे म्हणजे देशाला विकणे. असे म्हणता येईल.

 

 

First Published on: February 25, 2021 3:19 PM
Exit mobile version