हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर, आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका

हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर, आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका

भाजपचे नेते आमदार आशिष शेलार

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील हिल क्रिस्ट इमारतीजवळ वेरावली जलाशयाला जोडणारी जलवाहिनी मेट्रोच्या कामांमध्ये फुटली होती. त्याच्या दुरुस्तीच्या कामांमुळे विलेपार्ले ते जोगेश्वरी आदी भागांमध्ये पाण्याची बोंबाबोंब झालेली पहायला मिळाली. आता यावरून राजकीय वादंग सुरू झाले असून, भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुंबईकरांना चोवीस तास पाणी देऊ म्हणणाऱ्यांनी २४ तास बार उघडे ठेवलेत, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच गेले ३ दिवस मुंबईकर पाण्यावाचून तडफडत होते असे म्हणत गेली अनेक वर्षं मुंबईकरांसोबत ‘बनवाबनवी’ सुरु असून हे तर ‘ठग्ज ऑफ मुंबईकर’ असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपकडून एकेकाळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. आता या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजप आक्रमक दिसत आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांच्या मुंबई २४ तासला देखील भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. याचाच आधार घेत आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये मुंबईकरांना चोवीस तास पाणी देऊ म्हणणाऱ्यांनी २४ तास बार उघडे ठेवले, असे म्हटले आहे.

नेमकी काय केली शेलारांनी टीका

मुंबईकरांना २४ x ७ तास पाणी देऊ अशी ‘फेंकम फाक” करणाऱ्यांनी २४ x ७ बार उघडे केले. गेले ३ दिवस मात्र मुंबईकर पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थ संकल्पावर यांनी बोलण्यात काय अर्थ! ऐवढी वर्षे मुंबईकरांसोबत अशी ही बनवाबनवी सुरू आहे. हे तर ठग्स ऑफ मुंबईकर आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी ट्विटमधून केली आहे.

First Published on: February 2, 2020 6:03 PM
Exit mobile version