कुठल्याही बाजूने आरे झालं तर महाराष्ट्राकडून कारे करणार; आशिष शेलारांचा इशारा

कुठल्याही बाजूने आरे झालं तर महाराष्ट्राकडून कारे करणार; आशिष शेलारांचा इशारा

कर्नाटक – महाराष्ट्र दोन्ही बाजून तणावाचे वातावरण निर्माण करुन नये, होऊ नये. याविषयात महाराष्ट्र सरकारची भूमिका समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे की, आमचा अधिकार त्या गावांवर आहे आणि त्याबाबत सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका स्पष्ट आहे. कुठल्याही पक्षाचं सरकार असो तरी या भूमिकेत बदल केलेला नाही याचा आनंद आहे. शिंदे फडणवीस सरकारने एक टप्पा पुढे जाऊन त्या भागात काही योजना पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. जत तालुक्याच पाण्यासंदर्भातील योजना पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सामजस्याने हा विषय सुटला पाहिजे. कुठल्याही बाजूने आरे झालं तर महाराष्ट्राकडून कारे होईल. महाराष्ट्राकडून कारे आम्ही करूचं अशा इशारा आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. आज मुंबई भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत शेलार आज बोलत होते.

महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणी थांबवू शकत नाही

आमच्या संस्कृतीनुसार याविषयावर सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडत आहोत. कोणत्याही पद्धतीने तणाव, आक्रमकपणा कर्नाटकच्या बाजूने झाला, तर भाजप त्याच पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही शेलारांनी दिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केवळ तणावाच्या दृष्टीने तात्पुरता हा विषय मांडला असता तरी, या देशात कोणालाही कुठेही जाण्याची परवानगी आहे. महाराष्ट्रातील मंत्री जर तिथे जाणार असलीत तर तो कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. असही आशिष शेलार म्हणाले.

 ठाकरेंची घोषणा, धोरण कार्यक्रम म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण वाटतं असा प्रश्न शेलारांना पत्रकाराने विचारला. ज्यावर शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या मनातलं समजण्या इतका मी मनकवडा नाही. पण मला उद्धव ठाकरेंची घोषणा नक्की माहिती आहे, ती म्हणजे माझे कुटुंब, माझी जबाबदारी. त्यांची घोषणा, धोरण कार्यक्रम माझे कुटुंब माझी जबाबदारी. हा चष्मा लावला तर उत्तर सापडतं. अशा शब्दात शेलारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.


धारावी पुनर्विकास प्रकल्पावर आतापर्यंत झाले 31.27 कोटी खर्च

First Published on: December 3, 2022 2:51 PM
Exit mobile version