…तर मलिकांच्या राजीनाम्यासाठी विनापरवानगी मोर्चा काढू, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा

…तर मलिकांच्या राजीनाम्यासाठी विनापरवानगी मोर्चा काढू, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा

...तर मलिकांच्या राजीनाम्यासाठी विनापरवानगी मोर्चा काढू, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मलिकांच्या अटकेनंतर अद्याप त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला नाही. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान भाजप आमदारांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने ९ मार्चला विराट मोर्चाचे आयोजन केलं आहे. परंतु मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही. परवानगी दिली नाही तर आम्ही विनापरवानगी मोर्चा काढू असा इशारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी मुंबई पोलिसांची भेट घेतली होती. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही. मात्र परवानगी दिली नाही तर विनापरवानगीच मोर्चा काढण्यात येईल असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होणार आहे. मुंबईत राणीबाग ते आझाद मैदानापर्यंत असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. मोर्चा काढण्यासाठी कायदेशीर परवानगी मागितील होती. पोलिसांची भेट घेतली होती. जोपर्यंत राजीनामा घेण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारचा हा निर्लज्जपणा

महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिकांचा अद्याप राजीनामा घेतला नाही. कोर्टाने या प्रकरणात गंभीर स्वरुपाच्या नोंदी दिल्या आहेत. अद्याप मलिकांचा राजीनामा घेण्यात आला नाही. हा ठाकरे सरकराचा निर्लज्जपणा असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत. मतांसाठी आणि लाचारीसाठी राजीनामा घेण्यात येत नाही असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.


हेही वाचा : IT Raid : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनालांबरोबर संजय कदम, खरमाटेंच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

First Published on: March 8, 2022 1:51 PM
Exit mobile version