महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला खोचक सवाल

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला खोचक सवाल

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, आता शाळांबाबतच्या निर्णयावरुन भाजप नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शाळा सुरु करण्याबाबत सरकारचा सावळागोंधळ आहे. महाराष्ट्रात सराकर आहे की छळछावणी आहे, असा सवाल आशिष शेलार यांनी केले आहे.

परीक्षांवरुन संभ्रम, शाळा सुरु करण्यात सरकारचा सावळागोंधळ सुरु आहे, असे आशिष शेलार म्हणाले आहेत. शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच. पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. भयभीत आहेत,” असे आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

First Published on: November 21, 2020 10:14 AM
Exit mobile version