महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

चित्रा वाघ आणि फिर्यादीच्या आरोपामुळे परिवाराच्या प्रतिष्ठेला धक्का, कुचिक यांच्या मुलीचे महिला आयोगाला पत्र

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (State Women’s Commission)  कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (NCP Leader rupali chakankar ) यांची या पदी नेमणूक करण्यात आली. आज महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. चित्रा वाघ यांनी ट्विट करत ‘महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका’, असे म्हणत चांगलाच घणाघात केलाय. ‘चाकणकरांची या पदी नेमणूक झाल्यास पक्षाचे वेळोवेली कापले जाईल’, अशी टीका करण्यात आली आहे.

पहा चित्रा वाघ ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाल्यात?

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. यावर भाष्य करत चित्रा वाघ यांनी हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे. ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरत आहेत. पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचे नाक कापले जाईल’, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्त करण्यात आली आहे याबाबत मला अद्याप कोणतीही कल्पना नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटविषयी मला काही बोलायचे नाही अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. आज दुपार पर्यंत रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यावेळी रुपाली चाकणकर या चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे असेल.


हेही वाचा – Rupali Chakankar: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

First Published on: October 14, 2021 11:07 AM
Exit mobile version