पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी स्पष्ट; वाढदिवसाच्या बॅनरवरूर भाजप नेत्यांचे फोटो गायब

पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी स्पष्ट; वाढदिवसाच्या बॅनरवरूर भाजप नेत्यांचे फोटो गायब

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्टींनी डावलल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट दिसत आहे. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये परळीत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर गोपीनाथ मुंडे आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांचे फोटो दिसत आहे. मात्र, या बॅनरवर राज्यातल्या एकाही बड्या भाजप नेत्याचा (BJP) फोटो दिसत नाही आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी स्पष्ट दिसत आहे. (BJP leader missing from Pankaja Munde birthday banner)

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये परळीत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्याचे कारण म्हणजे प्रत्येक भाजापा नेत्याच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे फोटो असतात. परंतु, सध्या पंकजा मुंडेच्या बॅनरवर फोटो नाहीत. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय, कार्यकर्ते आणि नेत्यांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, भाजपा नेत्यांकडूनीही काहीच उत्तर समोर आलेले नाही.

काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकीवेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु, भाजपाकडून जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडेंचे नाव नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कालांतराने पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा विधान परिषदेसाठीही झाली. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आले.

दरम्यान, या सगळ्या प्रकाराची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत असल्याचे सध्या लावण्यात आलेल्या बॅनरवरून स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय, गेल्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली आहेत. तसेच भाजप नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली आहे. त्यामुळे येत्या काळात पंकजा मुंडे याबाबत काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – मग शेजाऱ्याचा बेटा राजा बनेल का? संदीप देशपांडेंच्या ‘त्या’ दाव्यावर किशोरी पेडणेकरांचा सवाल

First Published on: July 25, 2022 7:05 PM
Exit mobile version