लगता हैं कल से फिर…; राऊतांच्या सुटकेनंतर मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट

लगता हैं कल से फिर…; राऊतांच्या सुटकेनंतर मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट

शिवसेना नेते संजय राऊत यांची 102 दिवसांनी अखेर जेलमधून सुटका झाली. संजय राऊत यांची सध्या प्रकृती बरी नाही म्हणून त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. मात्र राऊतांच्या सुटकेमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उर्जा संचारली आहे. राज्यभरातील शिवसैनिकांनी कुठे पेढे वाटत, कुठे फटाके फोडून, तर कुठे महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आनंद साजरा केला. शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनीही राऊतांच्या जामीनाचे स्वागत केले. मात्र दुसरीकडे भाजप नेत्यांना राऊतांचा जामीन रुचला नसल्याचे दिसतेय. कारण राऊत आर्थर रोड तुरुंगातूनबाहेर येताच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाविरोधात पुन्हा मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलं आहे.

मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटले की, लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा …

त्यामुळे राऊतांच्या विरोधात आता पुन्हा भाजप नेते अॅटिव्ह होणार असल्याचे दिसतेय. मोहित कंबोज राऊतांना तुरुंगवास होण्याआधीपासून त्यांच्याविरोधात वक्तव्य करत आहेत.


 

First Published on: November 9, 2022 7:34 PM
Exit mobile version