‘आम्ही पण याच देशाचे आहोत, आमची पण जनगणना करा’

‘आम्ही पण याच देशाचे आहोत, आमची पण जनगणना करा’

Corona Virus: पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना, ओमिक्रॉनची शक्यता

देशातील जनगणनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे. यासाठी पंकजा मुंडे यांनी दिवंगत वडील, भाजप नेते आणि तत्कालीन खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या एक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. २०११ मधील संसदेतील भाषणाचा हा व्हिडिओ आहे. गोपीनाथ मुंडेंच्या या भाषणाचा दाखला देत पंकजा मुंडे यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही या देशाचे आहोत, आमची पण जनगणना करा. ओबीसी जनगणना ही एक गरज आणि अपरिहार्य आहे. काही आठवणी आणि काही आश्वासने’

या भाषणात गोपीनाथ मुंडे काय म्हणाले?

पंकजा मुंडे यांच्यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी जनगणना स्वतंत्र करण्याची मागणी केंद्र सरकारला केली होती. आयआयटीच्या प्रवेशाकरत त्यावेळी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले होते. दरम्यान एक जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती. म्हणून न्यायालयात ओबीसी आकडेवारी सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. पण त्यावेळी ओबीसीची आकडेवारी नसल्याचे सरकारने सांगितले, असे गोपीनाथ मुंडे म्हणाले होते. समाजाची मानसिकता अजूनही जातीवाचक असून पूर्णपणे तिचा नाश झालेला नाही. म्हणून जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. तसेच ५४ टक्के देशात ओबीसी समाज असल्याचे मुंडे यांनी सांगितले होते.

दरम्यान दर दहा वर्षांनी देशातील एकूण लोकसंख्या जाणून घेण्यासाठी जनगणना होते. २०२१मध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात देशाची १६वी जनगणना होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही जनगणना मोबाईल Appच्या माध्यमातून केली जाणार आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.


हेही वाचा – ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यात एल्गार


 

First Published on: January 24, 2021 3:28 PM
Exit mobile version