आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे; दरेकरांची टीका

आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे; दरेकरांची टीका

राज्यातील मराठा आरक्षणावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर मराठा तरुण आंदोलन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नसल्याचे आरोप केले. दरम्यान, आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. तसेच, आघाडी सरकारचे माघलाईचे राज्य सुरु आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरेकर यांनी व्हीडिओ शेअर केला असून यामध्ये मराठा तरुण आंदोलन करताना दिसत आहेत.

प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. दरेकर यांनी ट्विट केलेल्या व्हीडिओत काही मराठा तरूण आंदोलन करताना दिसले. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजीही होताना दिसली. यासोबतच त्यांनी एक ट्विटदेखील केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. “आघाडी सरकारचे मोघलाईचे राज्य सुरु आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर केसेस दाखल करण्यात आल्या. अधिवेशन चालू असताना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे. तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका,” असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला दिला आहे.

 

First Published on: December 14, 2020 10:18 AM
Exit mobile version