अन् विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांना अश्रू अनावार झाले

अन् विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांना अश्रू अनावार झाले

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी बुधवारी सांगली जिल्ह्याच्या दौरा करताना तडवळे गावाला भेट दिली. या गावातील तरूण शुभम जाधव हा २२ वर्षाचा तरुण अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला, त्यामुळे जाधव यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या घरी दरेकर यांनी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. अतिवृष्टीमुळे त्यांचे कुटुंबच उध्वस्त झाले आहे, पण अद्यापही कुठलीही शासकीय मदत त्यांना मिळालेली नाही.

आपले दु:ख दरेकर यांच्याकडे मांडताना त्या माऊलीने हंबरडा फोडला. माझे लेकरु पाण्यात वाहून गेले…मला माझे पिल्लू परत द्या…माझे लेकरु मला पुन्हा हवे आहे…माझा संसार उध्वस्त झाला…संसार फाटला…आम्हाला आधार देणारा निघून गेला…पावसाने आमचा घात केला…आमचे भविष्य बरबाद झाले….आता आम्हाला न्याय कोण देणार…या शब्दात त्या आईने आपली व्यथा दरेकर यांच्याकडे मांडली. यावेळी त्यांच्या व्यथा एकून दरेकर यांनाही अश्रु अनावर झाले. संवेदनशील विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी जाधव कुटुंबियांना धीर दिला. त्यांचा प्रश्न सरकारी दरबारी मांडण्यात येईल. अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या जाधव कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असे वचन दरेकर यांनी यावेळी दिले. यासंदर्भात तेथे उपस्थित असलेल्या तहसिलदारांशी त्यांनी चर्चा केली. तसेच हा विषय अतिशय संवेदनशील असून याप्रकरणी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलूव त्यांना लवकर मदत मिळवून देऊ. ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत…तुम्ही काळजी करु

First Published on: October 21, 2020 9:29 PM
Exit mobile version