राज ठाकरेंच्या भूमिकेची PM मोदींच्या मतदारसंघात अंमलबजावणी, BJP नेत्याकडून दिवसभरात ५ वेळा हनुमान चालिसा पठण

राज ठाकरेंच्या भूमिकेची PM मोदींच्या मतदारसंघात अंमलबजावणी, BJP नेत्याकडून दिवसभरात ५ वेळा हनुमान चालिसा पठण

राज ठाकरेंच्या भूमिकेची पीएम मोदींच्या मतदारसंघात अंमलबजावणी, भाजप नेत्याकडून दिवसभरात ५ वेळा हनुमान चालिसा पठण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मशिदींवरील भोंग्यांविरोधातील घेतलेल्या भूमिकेचे पडसाद महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश आणि वाराणसीमध्ये उमटत आहेत. मशिदींवरील भोंगे काढून टाकावे अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. या भूमिकेचे मनसैनिकांनी पालन करत राज्यात हनुमान चालिसा लावण्यात सुरुवात केली आहे. हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे. भाजपक कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्याकडून हनुमान चालिसा लावण्यासाठी भोंगे वाटप करण्यात आले आहेत. तर वाराणसीमध्येसुद्धा भाजप नेत्यांकडून घरावर भोंगे लावून दिवसातून ५ वेळा हनुमान चालिसा लावण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात आता मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर आता मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यात येत आहे. यूपीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात भाजप नेत्यांकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. मंदिर आणि घरांवर लाऊडस्पीकर लावण्यात येत आहेत.

वाराणसीचे भाजप नेते सुधीर सिंह यांनी काशीत तब्बल १०१ मंदिर आणि घरांवर लाऊडस्पीकर लावण्याचा निश्चय घेतला आहे. त्यांनी आपल्या घरावर लाऊड स्पीकर बसवला असून दिवसातून ५ वेळा हनुमान चालिसा लावण्यात येत आहे. मंदिरांमध्ये कित्येक वर्षांपासून वेद आणि हनुमान चालिसा पठण करण्यात येत होते.परंतु सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषणामुळे आवाजाची मर्यादा आखून दिली आहे. यानंतर मंदिरांवरील भोंगे काढण्यात आले परंतु मशिदींवर भोंगे वाढवण्यात आले असून पहाटे साडे चार वाजता अजान सुरु होते. यामुळे लोकांची झोप उडते आणि लोकांना त्रासही होतो. काशीमध्ये फक्त वैदिक मंत्र गुंजले पाहिजेत. त्यामुळे हनुमान चालिसा पठण बंद झाले होते ते पुन्हा सुरु करण्यात आले पाहिजे असे सुधीर सिंह यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Hanuman Chalisa: राज ठाकरेंच्या मशीदीच्या भोंग्यांविरोधातील अल्टीमेटमचा इफेक्ट यूपीत

First Published on: April 15, 2022 10:25 PM
Exit mobile version