भाजप आमदार गणेश नाईकांना न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

भाजप आमदार गणेश नाईकांना न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

ऐरोलीचे भाजप आमदार आणि माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना ठाणे जिल्हा सत्र न्यालयाने दणका दिला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणी करताना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पीडित तरुणीने गणेश नाईकांविरोधात नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात नेरुळ पोलीसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांना अटकेपूर्वी पोलिसांनी नोटीस बजावली होती. नोटीस मिळताच गणेश नाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात २ वाजता सुनावणी पार पडली. अखेर कोर्टाने नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलीस गणेश नाईक यांचा शोध घेत असून त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.

पीडित महिलेचा गणेश नाईकांवर गंभीर आरोप

दीपा चौहान नावाच्या तरुणीने गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या २७ वर्षांपासून गणेश नाईक माझ्या संपर्कात होते. मी माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. नाईकांसोबत असलेल्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आहे. मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर त्याला वडील म्हणून नाव देईल असे आश्वासन गणेश नाईक यांनी दिले होते. त्यांनी कोणतीही आर्थिक मदत केली नाही. गणेश नाईक यांनी अनेकदा माझ्यावर जबरदस्ती केली आहे. लैंगिक शोषण झाला असल्याचा आरोप पीडित महिलेने केले आहे. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली असून मुलासह मला अनेकदा धमकी देऊन घरातून बाहेर काढण्यात आले आहे. शारीरिक आणि मानसिक छळ गणेश नाईक यांनी केला असल्याची तक्रार महिलेने केली आहे.


हेही वाचा :  वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या का?; फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

First Published on: April 21, 2022 3:40 PM
Exit mobile version