शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत, भाजपचा हल्लाबोल

शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत, भाजपचा हल्लाबोल

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने टीका करण्यात येत होती. अशातच भाजपच्या एका आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवारांसोबत संजय राऊत गेले, आता कुठे आहेत ते?, नवाब मलिक आणि अनिल देशमुख कुठे आहेत?, राज्याचा गृहमंत्री सगळे पोलीस खाते चालवत होता, तो कधी आत केला त्यालाही कळलं नाही, अशा शब्दांत गोरेंनी राष्ट्रवादीवर टीका केली.

ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले नसते. सरकारच्या बाहेर बसणे पसंत केले असते. तुम्ही शरद पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. शरद पवारांनी आजपर्यंत एकही गोष्ट विश्वासाने केलेली नाही. तसेच शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत. त्यांच्यासोबत जे गेले त्यांचा कार्यक्रम ओके झाला, असं गोरे म्हणाले.


हेही वाचा : निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टासाठी अपेक्षित, जयंत पाटलांची प्रतिक्रिया


 

First Published on: September 27, 2022 8:32 PM
Exit mobile version