पोलिसास धक्काबुक्की करणार्‍या भाजप, शिवेसेनेच्या नगरसेवकांसह दोघांना अटक

पोलिसास धक्काबुक्की करणार्‍या भाजप, शिवेसेनेच्या नगरसेवकांसह दोघांना अटक

सरकारी कामात अडथळा आणत पोलीस कर्मचार्‍यास दोन नगरसेवकांसह दोनजणांनी धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी (दि.२९) मध्यरात्री अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो पॉइंट येथे घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भाजपचे नगरसेवक राकेश दोंदे व शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे यांच्यासह दोनजणांना अटक केली आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो पॉइंट येथे शिवसेना नगरसेवक भागवत आरोटे यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झाला. ही बाब नगरसेवक राकेश दोंदे यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस कर्मचारी विष्णू गावित यांना चौघांनी धक्काबुक्की व मारहाण केली. याप्रकरणी नगरसेवक राकेश दोंदे, नगरसेवक भागवत आरोटे, अमित आरोटे व अजय मिश्रा यांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करत आहेत.

First Published on: June 29, 2020 1:32 PM
Exit mobile version