अॅट्रोसिटीचा असा दुरूपयोग कधीच पाहिला नव्हता – चंद्रकांत पाटील

अॅट्रोसिटीचा असा दुरूपयोग कधीच पाहिला नव्हता – चंद्रकांत पाटील

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील परळी पोलिसांनी अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात रविवारी अटक केली. त्यानंतर बुधवारी मुंबईतील घरातही पोलिसांनी छापा टाकला. या संपुर्ण प्रकरणात धनंजय मुंडे यांनी जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप करूणा शर्मांनी केला आहे. आता या संपुर्ण प्रकरणात भाजपदेखील सक्रीय झाली आहे. भाजप करूणा शर्मा यांच्या पाठीशी आहे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांना न्यायालयात साथ देतानाच आंदोलन करण्याची तयारीही भाजपने दाखवली आहे. करूणा शर्मा यांना न्यायालयात साथ देणे आणि त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबतचा विचार भाजप करेल असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (BJP to help karuna Munde in legal fight and for agitation against Dhananjay Munde)

अॅट्रोसिटीचा अशा स्वरूपात दुरूपयोग होताना कधीच पाहिले नव्हते अशी प्रतिक्रियाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. करूणा शर्मा यांच्यावर रविवारी परळी पोलिसांकडून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करत त्यांना या प्रकरणात गोवण्यात आलं. तसेच त्यांच्या आवाजाच्या बनावट क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आल्या. त्यांच्या गाडीत एक महिला पिस्तूल ठेवत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. तसेच करूणा मुंडे यांच्या चालकांवरही अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करूणा शर्मा एकट्या लढत आहेत. अशा स्थितीत भाजप करूणा शर्मा यांच्या पाठीशी राहील असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी करूणा शर्मा यांना अटक केल्यानंतर बीड पोलिसांकडून बुधवारी करूणा शर्मा यांच्या सांताक्रूझ येथील घरी छापा टाकला. या छाप्याबाबतची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. करूणा शर्मा यांना रविवारी झालेल्या अटकेनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर त्यांच्या चालकाला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.


हेही वाचा – धनंजय मुंडे प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी – चंद्रकांत पाटील


 

First Published on: September 9, 2021 9:52 AM
Exit mobile version