भिवंडीत भाजपचे वॉर रुमचे उद्घाटन

भिवंडीत भाजपचे वॉर रुमचे उद्घाटन

भिवंडीत भाजपचे वॉर रुमचे उद्घाटन

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचाराचे तंत्र अधिक प्रभावी झाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा तंत्रशुद्ध वापर करीत सर्वसामान्यांना आपल्याकडे आकर्षित केले होते. त्यामुळे वॉररूमचे महत्व निवडणूक काळात वाढले असून भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी भारतीय जनता पार्टीने आपल्या मध्यवर्ती कार्यालयात सुसज्ज वॉर रूम स्थापित केले आहे. या वॉर रुमचा उद्घाटन सोहळा खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला आमदार महेश चौघुले, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या उपस्थित होते. या वॉर रूममध्ये दोन विधानसभा क्षेत्राची इतंभूत माहिती संकलित केली जाणार आहे. त्यादृष्टीने कामाची आखणी करून नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. या प्रसंगी विरोधीपक्ष नेता शाम अग्रवाल, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल पाठारे, महिला आघाडी च्या ममता परमाणी , सरचिटणीस प्रेषित हर्षल पाटील यांसह असंख्य पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले खासदार कपिल पाटील?

भिवंडी लोकसभेची बांधणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करीत असतानाच त्या कामाचे नियोजन या वॉर रुमच्या माध्यमातून केले जाणार आहे. जसजसे निवडणुक प्रचाराला रंग चढेल तसतसे येथील वॉर रूममधील कार्य अधिक प्रभावीपणे सुरु करून शेवटच्या मतदारपर्यंत पोहचण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भिवंडी भाजप कार्यकारिणीने भिवंडी पूर्व आणि पश्चिम विधानसभा क्षेत्रात तब्बल १ लाख ६० हजार मते भाजपला कशी मिळतील, याचे नियोजन केले आहे. त्या कार्यास खासदार कपिल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना भाजप युती संदर्भात बोलताना कपिल पाटील यांनी ‘युतीतील सर्व सहकारी प्रामाणिकपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत यासाठी कामाला लागले असून, कार्यकर्त्यांचे मनोमिलन नक्की होणार आहे’, असे सांगितले. यापुढे ते म्हणाले की, ‘बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक हा कधीही काँग्रेसला मतदान करू शकणार नाही. काही एखाद टक्के लोक सत्तालोभाची महत्वाकांक्षा बाळगून असतील त्यांची दखल आम्ही घेत नाहीत.’

First Published on: March 14, 2019 10:53 PM
Exit mobile version