महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होणार; जे. पी. नड्डांचं सूचक विधान

महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होणार; जे. पी. नड्डांचं सूचक विधान

महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होणार आहे, असं भाकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील सध्याचं सरकार कोण चालवतंय आणि कुठून चालतंय हेच कळत नाही आहे. त्यामुळे हे सरकार लवकरच घरी बसतील आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असं सूचक विधान जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष कायमच विरोधी पक्षात राहतील. भाजप कोणत्याही पक्षाशी राज्यात युती करणार नाही, असे संकेत नड्डा यांनी दिले. राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. जनतेने तसा कौल दिला होता. मात्र, राजकारणात कधी कधी होतो, हा धोका राज्यातील जनतेसोबत झाला, असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं. यावेळी नड्डा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. कृषी कायद्यावरुन शरद पवार आणि काँग्रेसवर हल्ला चढवला. शरद पवार यांनी आधी शेतकरी कायद्याचं समर्थन केलं तर चांगलं आणि मोदींनी ते मंजूर केलं तर ते देशद्रोही. असं कसं? असा सवाल देखील त्यांनी केला.


हेही वाचा – पत्रकारांसह दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना लोकल प्रवासाची मुभा


 

First Published on: October 9, 2020 8:58 AM
Exit mobile version