‘बारामती पॅटर्न’ चा अभ्यास करणे हा भाजपचा छुपा अजेंडा

‘बारामती पॅटर्न’ चा अभ्यास करणे हा भाजपचा छुपा अजेंडा

नाशिक : प्रत्येक अर्थमंत्र्याला आपल्याही मतदारसंघात आदर्श विकासकामे व्हावीत अशी इच्छा असते. कधी कधी काय करावं हे कळत नाही. त्यामुळे बारामती मतदारसंघातील आदर्श कामांचा अभ्यास करणं हाच भाजपचा छुपा अजेंडा असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निर्मला सितारामन यांच्या बारामतीच्या निरीक्षकपदी नियुक्तीवर टोला लगावला ते आज नाशिक येथे बोलत होते.

हे तर शिंदे . फडणवीस सरकारचे अपयश

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून जाण्यामागे सर्वस्वी जबाबदारी शिंदे सरकारची आहे. शिंदे सरकार येण्याआधी मविआ सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी वेदांतासोबत अनेकदा चर्चा केली. ३९ हजार कोटी रूपयांच्या सवलती तत्कालीन सरकारने देऊ केल्या. महाराष्ट्रासोबत गुजरात राज्य स्पर्धेत होते. त्यांनी २७ हजार कोटी रूपयांच्या सवलती देऊ केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एमओयुसाठी या असे पत्र पाठवलेले आहे. आमच्या काळात जर उशिर झाला असे म्हणता मग शिंदेंनी पत्र का दिले ? पण आज तो प्रकल्प गुजरातला गेला. आमच्या सरकारवर आरोप करतांना राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनिल अग्रवालांना जाऊन भेटले का ? पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली ? असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीश्वरांची नाराजी नको म्हणून आता हे दोघे अग्रवाल यांना भेटायलाही घाबरताहेत असा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले जयंत पाटील
First Published on: September 22, 2022 5:56 PM
Exit mobile version