राज्यातील अतिदुर्गम तालुक्यात ‘ब्लड ऑन कॉल’ योजना!

राज्यातील अतिदुर्गम तालुक्यात ‘ब्लड ऑन कॉल’ योजना!

आरोग्य मत्री दीपक सावंत

पालघर जिल्ह्यांसह अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ‘ब्लड ऑन कॉल’ ही योजना विशेष बाब म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जव्हार ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी भागातील मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर रक्त उपलब्ध होणे गरजेचे असल्याने या योजनेचा आदिवासी भागात मोठा लाभ होणार आहे.

गर्भवती माता तसेच प्रसुतीदरम्यान नेहमी रक्ताची गरज भासते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील बांधवांना रक्त पिशवी आणण्याकरिता नाशिक, ठाणे, पालघर येथे जायला लागायचे. पण, आता जव्हार कुटीर रुग्णालयात शासकीय रक्तपेढी सुरु झाल्याने आदिवासी भागातील रुग्णांना रक्तासाठी वणवण फिरण्याची गरज भासणार नाही. ही रक्तपेढी या भागातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात ‘जीवन अमृत सेवा’ (ब्लड ऑन कॉल) ही योजना जिल्हास्तरावरच सुरु करण्यात आलेली आहे. पण, आदिवासी आणि दुर्गम भागातील गरज लक्षात घेता विशेष बाब म्हणून अमरावती, पालघर, नंदुरबार या जिल्ह्यातील अनुक्रमे धारणी, चुर्णी, डहाणू, जव्हार, धडगाव, अक्कलकुवा येथे ही योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या रक्त साठवणूक केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार रक्त पुरवठा केला जाईल.

आदिवासी आणि दुर्गम भागात प्रसुतीदरम्यान मातामृत्यूचे प्रमाण लक्षात घेता या योजनेंतर्गत रुग्णाला वेळेत रक्तपुरवठा झाल्यास प्रसुतीदरम्यान होणारे मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र रक्तसंकलनात देशात अग्रेसर असून १६ लाख २ हजार ६९० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात एक टक्का रक्त उपलब्ध असणे आवश्यक असून महाराष्ट्राचे रक्तसंकलन हे लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

थंडीचा गारवा, दमटपणा आणि प्रदूषण म्हणजेच धूर-धूरके या सर्वाचा त्रास हिवाळ्यात होतो.यातून काहींना थंडी, खोकल्याचा ही आजार जाणवतो. पण, याच काळात श्वसनविकारांचा त्रास ही मोठ्या प्रमाण वाढतो. त्यामुळे अशा आजारांवर घरगुती उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

हवेतील धुलिकणांमुळे शरीरातून कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकता येत नाही. त्यामुळे कधी- कधी श्वसन नलिकेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क लावूनच पडा असा सल्ला डॉक्टर देतात.

याविषयी छातीरोग तज्ज्ञ आणि फुप्फुस विकार डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितलं की, “या दिवसात वातावरण अधिक धूर-धूरके असतात. त्यामुळे दमा, श्वसनविकारांमध्ये वाढ होते आहे. ३० पैकी २० रुग्णांना तरी दमा आणि अस्थमाची लक्षण सध्या दिसून येत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर ६० ते ७० टक्के एवढ्या रुग्णांमध्ये सध्या दम्याची लक्षण आढळत आहेत. हे वाढतं प्रमाण आहे. त्यामुळे बाहेर निघताना किमान तोंडावर स्कार्फ बांधावा. ज्यामुळे नाकावाटे धूलिकण शरीरात प्रवेश करु शकणार नाहीत.”

हे वाचा –

वाचा : राज्यात २ कोटी १० लाख बालकांना गोवर-रुबेलाचे लसीकरण

वाचा : स्त्यावरील अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय सेवा देणार – डॉ. दीपक सावंत

First Published on: December 24, 2018 8:39 PM
Exit mobile version