महापालिकेत नोकरी लावण्याचे तरुणांना दाखवले आमिष, महिला अधिकाऱ्याकडून २ कोटींचा गंडा

महापालिकेत नोकरी लावण्याचे तरुणांना दाखवले आमिष, महिला अधिकाऱ्याकडून २ कोटींचा गंडा

fraud

सध्या कोरोना काळात आणि कोरोनाच्या संकटापुर्वीही नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातला असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात काही आरोपींनाही अटक करण्यात आले आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लावण्याचे आमिष चक्क महानगरपालिकेतील महिला अधिकारी यांनी दाखवले आहे. एवढेच नाही तर या महिलेनं तब्बल २ कोटी २७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांना गंडा घातला गेला आहे. अखेर तरुणांनी नोकरी लावण्यासाठी तगादा लावल्यानंतर टाळाटाळ झाल्यांनंतर संबंधित प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी महिलेला गोव्यातून अटक केली आहे.

कोरोनाचा काळ असल्यामुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. नोकरीच्या शोधात अनेक तरुण असून भेटेल तिथे नोकरी करण्यासाठी तयार आहेत. परंतु याचा फायदा काही काळाबाजार करणारे घेत आहेत. असंच मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष तरुणांना दाखवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेत अधिकारी पदावर असणाऱ्या महिलेनं पदाचा दुरुपयोग केला आहे. महिला अधिकारीचे नाव प्रांजल भोसले असे आहे. या महिलेकडून पती आणि नातेवाईकांच्या मदतीनं तरुणांना गंडा घालण्याचा प्रकार सुरु होता. यामध्ये मोठ्या संख्येनं तरुणांना महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आलं आणि त्यांच्याकडून आर्थिक फायदा करुन घेतला. या तरुणांकडे नोकरी लावण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली.

अस आलं प्रकरण समोर

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मुंबई महानगरपालिकेत कामाला लावण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. विविध विभागात भर्ती करण्याचे सांगून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली आहे. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची फसवणूक या टोळीने केली आहे. महिला अधिकारी प्रांजली भोसले आणि तिचा पती लक्ष्मण भोसले तसेच त्यांचे साथीदार राजेश भोसले, महेंद्र भोसले यांचाही तरुणांना फसवणूक करण्यात सहभाग होता.

संबंधित महिला अधिकारी या साथीदारांच्या मदतीने कित्येक तरुणांना गंडा घालत होती. अखेर नोकरीसाठी पैसे दिलेल्या तरुणांनी नोकरीसाठी तगादा लावला प्रांजल यांनी नोकरी लावण्यामध्ये टाळाटाळ करायला सुरुवात केली. यामुळे तरुणाने मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात महिला अधिकारी प्रांजल भोसलेंविरोधात तक्रार केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला. तपासादरम्यान महिला अधिकारी राहत्या घरी नसल्याचे समजले आणि मगाील वर्षभरापासूनच गायब असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी शोध सुरु ठेवला आणि गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला प्रांजली भोसले ही महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी असल्याचे समजले. अधिक तपासामध्ये त्या ऑक्टोबर २०२० पासून रजेवर असल्याची माहिती मिळाली. पोलीस आणि मालमत्ता कक्षाने तपास सुरु ठेवला होता या तपासादरम्यान महिला अधिकारी प्रांजल भोसले ही आपल्या पतीसोबत गोव्यात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गोव्यातील मालमत्ता कक्षाचे अधिकारी यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या मदतीने प्रांजली भोसले यांना पतीसह अटक करण्यात आली.

भोसले जोडप्याला गोव्यात अटक केल्यानंतर मुंबईला आणण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर साथीदार राजेश भोसले, महेंद्र भोसले यांनाही कल्याण आणि ठाणे शहरातून अटक करण्यात आली. या टोळीची चौकशी केल्यानंतर एकूण २ कोटी २७ लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीची चौकशी सुरु असून फसवणूक करुन कोट्यावधींचा गंडा घातला आहे परंतु हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

First Published on: June 30, 2021 11:34 PM
Exit mobile version