हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदरात सापडला अजून एक मृतदेह

हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदरात सापडला अजून एक मृतदेह

हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदरात सापडला अजून एक मृतदेह

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळला होता. आता त्याच परिसरात अजून एकाचा मृतदेह सापडला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरु आहे.

मुंब्रा रेतीबंदर येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह आढळला. हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली आहे. शेख सलीम अब्दुल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ४८ वर्षीय शेख अब्दुल सलीम मुंब्रा, रेतींबदर येथे वास्तव्यास होते. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस अधिकारी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष (RDMC) आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

First Published on: March 20, 2021 12:30 PM
Exit mobile version