करोनामुळे पुण्यातील अनेकांनी लग्न ढकलली पुढे, बॉलिवूडकरांनाही लग्नाच्या तारखा बदलल्या!

करोनामुळे पुण्यातील अनेकांनी लग्न ढकलली पुढे, बॉलिवूडकरांनाही लग्नाच्या तारखा बदलल्या!

करोना व्हायरसमुळे भारतीय नागरिक आता दक्षता घेऊ लागले आहेत. तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे असे शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद नागरिक देत आहेत. अनेकांनी आपले घरगुती समारंभ पुढे ढकलले आहेत. पुण्यातही दोन जोडप्यांनीही करोनाची रिस्क न घेणच पसंत केलं आहे. त्यांनी आपले लग्न पुढे ढकलले आहे. या पुण्यातील कपलप्रमाणेच बॉलिवूडकरांनाही करोनाचा फटका बसला आहे. अभिनेता वरूण धवन व अली फझल यां दोघांचीही लग्न करोनामुळे लांबणीवर पडली आहेत.

पुण्यात करोनाग्रस्तांची संख्या १९वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काळजी घेतली जात आहे. पुण्यात हॉटेल्ससह अनेक कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आता आपल्या आयुष्यात महत्त्वाचा दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या दोघांचे लग्न पुण्यातील चिंचवडमध्ये होणार होते. मात्र सध्या राज्याची मेडिकल स्थिती बघता या दोघांनी लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

अली फझल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा एप्रिल महिन्यात लग्न करणार होते. मात्र सध्या सध्या वाढत चाललेला करोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता या दोघांनी त्यांचे लग्न डिसेंबरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे लग्न दिल्ली आणि दुबई अशा ठिकाणी होणार होते.

तर अभिनेता वरूण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांचे लग्नदेखील मे महिन्यात थायलंडमध्ये होणार होते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लग्नाचे ठिकाण बदलले होते. जोधपूरमध्ये लग्न करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला होता. मात्र आता देशातही कोरोना पसरत असल्यामुळे त्यांनी देखील लग्न डिसेंबरमध्ये करम्याचे ठरविले आहे.

First Published on: March 18, 2020 1:18 PM
Exit mobile version