व्यभिचारी पत्नी घटस्फोटानंतर पोटगीसाठी पात्र नाही

व्यभिचारी पत्नी घटस्फोटानंतर पोटगीसाठी पात्र नाही

घटस्फोट

जर पत्नीने परपुरुषासोबत विवाहबाह्य संबंध ठेवले असतील आणि त्यातून तिचा पतीसोबत घटस्फोट झाला असेल तर तिला पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. घटस्फोटासाठी याचिका पतीच्या वतीने करण्यात आली होती. न्यायालयात तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं सिद्ध झाल्याने घटस्फोट देण्यात आला आहे. तेव्हा या प्रकरणात नवऱ्याची कोणतीही चूक नसल्याने पत्निची पोटगी रद्द केल्याचा निर्णय न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मोही गावातील कोमल आणि विशाल (बदललेली नावं) यांचा १९८० मध्ये विवाह झाला होता. त्यांना तीन मुलंही अपत्येही आहेत. मिलिटरीतून निवृत्त झाल्यामुळे विलासला नाशिकमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरी मिळाली. नोकरीच्या निमित्ताने विलास आणि कोमल आपल्या मुलांसह नाशिकला स्थायिक झाले. विलास दिवसा घराबाहेर राहिल्याने त्यांच्याच घरी राहणाऱ्या वासूसोबत सुशिलाचं जुळलं. त्यातून त्याचे अनैतिक संबंध सुरू झाले. ही बाब समजल्यानंतर विलासने वासूला घराबाहेर काढले.
वासूचा विरह सहन झाल्याने कोमलही १९९३ मध्ये वासूच्या घरी पळून आली. त्यानंतर विलासने घटस्फोटासाठी अर्ज केला. लग्नाच्या वीस वर्षानंतर २७ एप्रिल २००० मध्ये सांगली कुटुंब न्यायालयाने कोमल आणि विशालचा घटस्फोट मंजूर केला. त्यावेळेस, न्यायालयाने कोमल आणि तिच्या मुलीला अनुक्रमे १५० आणि १२५ रुपयांची पोटगी मंजूरी केली. पण, ही पोटगी वाढवून मिळाली यासाठी कोमलने कनिष्ठ न्यायालयाकडे अर्ज केला. पण, तो मंजूर करत न्यायालयाने पत्नीला ५०० रुपये आणि मुलांच्या खर्चासाठी ४०० रुपये वाढवून दिली. पण, याच याचिकेविरोधात विशालने सत्र न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल करत पोटगी रद्द करण्याची मागणी केली. १३ जुलै २०१५ मध्ये सांगली जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीशांनी ही याचिका मान्य करत पोटगी रद्द करण्याचे आदेश दिले.
या निकालाला कोमलने २०१६ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी झाली. घटस्फोटानंतर महिलेला पोटगी मिळणं हा तिचा अधिकार असल्याचा दावा करत ही याचिका करण्यात आली होती. पण, पतिने पत्नी व्यभिचारी असल्याचं स्पष्ट केल्यामुळे तसंच, तिच्यावरचे आरोप स्पष्ट झाल्यामुळे हा घटस्फोट मंजूर करण्यात आला आणि या प्रकरणात पतीची कोणतीही चूक नसल्याने पत्नीला पोटगी मिळणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

First Published on: December 25, 2019 12:01 PM
Exit mobile version