लाचखोरी थांबेना! वर्षभरात १६१ छापे; २३५ जणांना अटक

लाचखोरी थांबेना! वर्षभरात १६१ छापे; २३५ जणांना अटक

लाच स्विकारणे हा गुन्हा आहे, असे फलक शासकीय कार्यालयात दिसत असले तरी उत्तर महाराष्ट्रात लाचखोरी थांबलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यातील पथकांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालवधीत टाकलेल्या तब्बल १६१ ठिकाणी छाप्यात २३५ जण लाच घेताना अडकले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ६२, अहमदनगर जिल्ह्यातील ३४, धुळे १८, नंदुरबार १५ आणि जळगाव ३२ सापळा कारवाई करण्यात आली. या कारवाईत २३५ अधिकार्‍यांमध्ये नाशिक परिक्षेत्रात वर्ग १ चे १४, वर्ग २ चे २५, वर्ग ३ चे १२६, वर्ग ४ चे १४, इतर लोकसेवक १७ व खासगी इसम ३९ यांचा समावेश आहे.

नाशिक परिक्षेत्रात या वर्षी ०५ केसेस न्यायालयात शाबीत झाल्या. त्यामध्ये नाशिक घटकात २, नगर घटकात २ व नंदुरबार घटकात २ या प्रमाणे शाबीत निकाल लागले आहेत. यामध्ये राजु पुणा रामोळे, शाखाधिकारी, लघुपाटबंधारे उप विभाग, सटाणा, जि. नाशिक. यांचे वरील सन २०१९ मधील लाच मागणी कारवाई न्यायालयाने त्यांना दोषी ठरवुन ५ वर्ष शिक्षा व १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी व अंमलदार यांनी केली.

 

नाशिक परिक्षेत्र राज्यात पहिल्या स्थानी

नाशिक परिक्षेत्र १६१ सापळा कारवाई करून राज्यात सापळा कारवाईत पहिल्या स्थानी आहे. वर्षभरात २ कोटी १५ लाख ९ हजार ३६० रुपये लाच स्विकारण्याचे सापळा कारवाई करण्यात आली.

सर्वात मोठ्या रकमेची कारवाई
२०२३ मध्ये नाशिक परिक्षेत्रामध्ये सर्वात मोठी कारवाई नाशिक घटकतील पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत व त्यांचे टीमने नगर घटकात महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ विभागातील सहा अभियंता अमित गायकवाड व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याचे केली. अमित गायकवाड यास १ कोटी रुपये लाचेची रक्कम स्विकरतांना पकडण्यात आले.

वर्षभरातील उल्लेखनीय कारवाया

First Published on: January 1, 2024 2:34 PM
Exit mobile version