गावठी दारूच्या विक्रीवर बंदी आणावी; शेकापच्या जयंत पाटलांची विधान परिषदेत मागणी

गावठी दारूच्या विक्रीवर बंदी आणावी; शेकापच्या जयंत पाटलांची विधान परिषदेत मागणी

राज्यात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. शिवाय, गावठी दारूही विकाली जात आहे. त्यामुळे या अवैध दारूच्या विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. (bring a ban on the sale of illegal liquor in the state demand of Jayant Patil of Shekap in the Legislative Council)

विधानपरिषदेत कायदा व सुव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्थेच्या मुद्द्यावर शेकापचे नेते जयंत पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात अवैध दारू आणि गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे सांगितले. दारूच्या अवैध विक्रीमुळे रोगराई पसरत आहे. त्यामुळे या अवैध आणि गावठी दारू विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

दमण आणि उल्हासनगर परिसरातून दोन नंबरच्या दारूची विक्री होत आहे. या दारूमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोड द्यावे त्यामुळे अवैध दारूवर बंदी आणण्यासाठी दारूची अधिकृत दुकाने सुरू करा. दुकाने सुरू केल्यास अधिकृतरित्या टॅक्सही कापला जाईल. त्यामुळे अवैध दारूला आळा बसेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशाचा आज सहावा दिवस आहे. आज सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकमेकांवर करत असलेल्या घोषणांवरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले.

First Published on: August 25, 2022 11:49 AM
Exit mobile version