Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपाचे नेते गावोगाव पोहोचविणार – चंद्रकांत पाटील

 Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपाचे नेते गावोगाव पोहोचविणार – चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या एक लाख 80 हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला. महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी गावोगाव हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बातचित करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सोप्या शब्दात वेगवेगळ्या समाज घटकांना केंद्रीय अर्थसंकल्पाचा कसा लाभ होणार आहे हे सांगितले. शेतकऱ्यांना दीर्घकाळ उपयोगी पडणारा शेतकरी ड्रोनचा उपक्रम, ग्रामीण महिलांचे पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची साठ हजार कोटींची योजना, ऐंशी लाख घरे असे विविध प्रस्ताव मोदीजींनी नेते समजून दिले. क्रिप्टो करन्सी, डिजिटल बँकिंग असे विषयही मोदीजींनी समजून दिले. आता पक्षाचे नेते हा संदेश गावोगाव पोहोचवतील.

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी या देशव्यापी संवाद उपक्रमात सहभागी झाले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, संजय कुटे, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, जयप्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस (मुख्यालय) अतुल वझे व प्रदेश चिटणीस संदीप लेले उपस्थित होते.


हे ही वाचा – IPL 2022 Auction: आयपीएलच्या लिलावात उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचं वर्चस्व, एक संघ होऊ शकतो तयार


 

First Published on: February 2, 2022 4:49 PM
Exit mobile version