कोरोना पॉझिटिव्ह कॅबिनेट मंत्र्याला एअरलिफ्ट नाकारले; नांदेड ते मुंबई रुग्णवाहिकेत प्रवास

कोरोना पॉझिटिव्ह कॅबिनेट मंत्र्याला एअरलिफ्ट नाकारले; नांदेड ते मुंबई रुग्णवाहिकेत प्रवास

प्रातिनिधिक छायाचित्र

महाविकास आघाडी सरकारमधील एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी काल आली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुबंई येथे उपचार घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना विमानाने मुंबईत आणले जाईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र अधिकाऱ्यांच्या लालफिती कारभारामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशनानंतरही सदर कॅबिनेट मंत्र्याला विमान मिळू शकले नाही. शेवटी नांदेड ते मुंबई असा ५७४ किमी आणि १२ तासांचा प्रवास या मंत्र्याला आता रुग्णवाहिकेतून करावा लागत आहे.

सदर कॅबिनेट मंत्री हे लॉकडाऊनच्या काळात आपल्या मतदारसंघातच होते. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ते मुंबईत आले होते. त्यानंतर ते पुन्हा आपल्या मतदारसंघात परतले. यावेळी त्यांनी तिथे स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतले होते. तसेच त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली असता त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी नांदेमध्ये प्राथमिक उपचार घेतले. मात्र पुढील उपचार मुंबईत घ्यायचे, असे त्यांनी ठरविले.

मुंबईत उपचार घ्यायचे ठरविल्यानंतर सदर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना हा विचार सांगितला. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा हा विचार योग्य असल्याचे सांगत विमानाद्वारे मुंबईला आणण्यासाठी प्रयत्न करु असे कळविले. मात्र राज्यातील एका बड्या सनदी अधिकाऱ्याने कोरोनाबाधित रुग्णाला विमानाने आणता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर मंत्री रुग्णवाहिकेनेच मुंबई दिशेने रवाना झाले.

 

 

First Published on: May 25, 2020 2:57 PM
Exit mobile version