धक्कादायक! महाविद्यलयाजवळ आढळून आला जळलेला पाय

धक्कादायक! महाविद्यलयाजवळ आढळून आला जळलेला पाय

चंद्रपूर शहरातील तुकूम भागातील विधी महाविद्यालयाजवळ एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. या महाविद्यालयाजवळ एका महिलेतचा जळलेला पाय आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्ळी दाखल झाले आहेत. सध्या या घटनेचा शोध सुरु आहे.

नेमके काय घडले?

चंद्रपूर शहरातील तुकुम भागातल्या विधी महाविद्यालय परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्धवट जळालेला महिलेचा पाय आढळून आला आहे. एका पॉलिथिनमध्ये गुंडाळून असलेला हा पाय अर्धवट जळालेल्या स्थितीत स्थानिक तरुणाला आढळून आला. या घटनेची माहिती तात्काळ तरुणाने रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी आपल्या पथकासह श्वान पथकाला पाचारण करत स्थळाचा पंचनामा सुरु केला. दरम्यान, फॉरेन्सिक विभागाने घटनास्थळावरुन सर्जिकल कामात वापरले जाणारे काही हातमोजे – कात्री आदी साहित्य देखील ताब्यात घेतले आहे. मात्र हे सर्व सामान कुठून आले असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. तसेच या मार्गावर मांस विक्रीची देखील दुकाने आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक शोध घेत आहेत.


हेही वाचा – दहावीचा विद्यार्थी खड्ड्यात पडून जखमी; पालिकेचा निष्काळजीपणा


 

First Published on: March 9, 2020 5:12 PM
Exit mobile version