‘पण अहंकार आडवा येतो’; उद्धव ठाकरेंचे नाव न घेता प्रवीण दरेकरांचा टोला

‘पण अहंकार आडवा येतो’; उद्धव ठाकरेंचे नाव न घेता प्रवीण दरेकरांचा टोला

राज्यात सत्तांतर झाले त्याला अनेक दिवस उलटून गेले तरीही शिंदे गट (cm eknath shinde) आणि ठाकरे गट (uddhav thackeray) यांच्यात तू तू मैं मैं अजूनही सुरूच आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ”जे आम्हाला सोडून गेले ते कधीच अमचे नव्हते तर त्यांचा काय विचार करायचा, आता जे आमच्या सोबत आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत”. अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली होती. यावरच प्रतिक्रिया देताना भाजपचे(bjp) प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. ”जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ते नाराज शिवसैनिकांची विचारपूस करायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे पण आता अहंकार आडवा येतो” असा टोला टोला दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना लावला आहे.

हे ही वाचा –  सरडापण लाजेल एवढी भूमिका राज ठाकरेंनी बदलली, किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

‘सध्या जी शिवसेना आहे त्यात हाच तर प्रॉब्लेम आहे. बाळासाहेब ठाकरे नाराज शिवसैनिकांना बोलावून घ्यायचे आणि त्यांची आपुलकीने चौकशी करायचे, मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवायचे. बाळासाहेब (balasaheb thackeray) त्यांच्याशी चर्चा करायचे आणि त्यानंतर ही नाराज मंडळी पुन्हा शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी व्हायची’ असं प्रवीण दरेकर किशिरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर प्रतिकिया देताना म्हणाले.

सत्तांतर आले आणि 54 आमदारांपैकी 40 आमदार शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले. ते 40 आमदार त्यांच्यासाठी महत्वाचे नाहीत कारण अहंकार आडवा येतो. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली आणि आता ते भारत जोडो यांत्रेलासुद्धा उपस्थित राहणार आहेत, असा टोला प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

हे ही वाचा – ‘जो माणूस बायकोला साडी घेऊ शकत नाही तो…’; एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना खोचक टोला

First Published on: October 27, 2022 3:43 PM
Exit mobile version