चक्रीवादळांचा बंदोबस्त, कोकणासाठी ३ हजार कोटी

चक्रीवादळांचा बंदोबस्त, कोकणासाठी ३ हजार कोटी

कापूस, सोयाबीनसाठी हजार कोटींचा निधी, राज्यात २७० टॅंकर्सनी पाणीपुरवठा, वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय

निसर्ग आणि तौत्के अशा वादळांच्या बंदोबस्तासह कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी ३ हजार कोटी रुपये देण्याचा मोठा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. कॅबिनेटच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टी आणि चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं होतं. त्यात अनेकांचा बळीही गेला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. या निधीच्या माध्यमातून पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थितीविरोधात कायमस्वरुपी उपायोजना केल्या जातील. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढलंय. तसंच वादळांनी अतोनात नुकसान केलंय. कोकणालाही याचा मोठा तडाखा बसला होता. कोकणवासीयांचं हे संकट कायमस्वरुपी थोपवण्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या जिल्ह्यांमध्ये होणार उपाययोजना

कोकणातल्या पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तीन हजार कोटी निधीतून उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने जमिनीची धूप रोखण्यासाठी बंधारे, निवारा गृह, भूमिगत वायरिंगच्या कामांचा समावेश आहे.

First Published on: September 15, 2021 6:57 PM
Exit mobile version