‘प्रत्येकाने लघवी साठवल्यास देशाचे ४० हजार कोटी वाचतील’ – नितीन गडकरी

‘प्रत्येकाने लघवी साठवल्यास देशाचे ४० हजार कोटी वाचतील’ – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

देशातील प्रत्येकाने आपलं युरीन अर्थात लघवी साठवून त्यापासून युरिया तयार केला तर देशाचे ४० हजार कोटी रुपये वाचतील, असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. नागपूर येथील ‘सरपंच सम्राट’ या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. देशातील ग्रामीण भागांमध्ये योग्य त्या सुविधा पोहोचत नाही, त्यामुळे लोक शहराकडे वळत आहेत आणि शहरात लोकसंख्या वाढल्यामुळे शहरातील समस्या वाढल्या आहेत, असे गडकरी म्हणाले.

नेमकं काय म्हणाले गडकरी?

नितीन गडकरी म्हणाले की, ‘देशात साखर, डाळ, तांदूळ यांचे प्रमाण अतिरिक्त आहे. त्यामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. सरकार कुणाचंही असो, मात्र परिस्थिती तीच आहे.’ यावेळी त्यांनी ग्रामीण भागाविषयी भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘पूर्वी गावात ८५ टक्के लोक राहायचे, पण आता ६५ टक्के लोक राहतात. सुविधा नसल्यामुळे २० टक्के लोक गाव सोडून शहरात आले. त्यामुळे शहरातील समस्या वाढल्या. गावात काम नाही, चांगलं शिक्षण नाही, म्हणून लोक गावं सोडत आहेत. याशिवाय गावात डॉक्टर नाही, डॉक्टर असला तर नर्स नाही, दोन्ही असले तर औषध नाही. मग कोण मरायला जाईल दवाखान्यात?’

First Published on: March 9, 2019 4:34 PM
Exit mobile version