साताऱ्यात भाविकांची गाडी दरीत कोसळली; ३ भाविकांचा मृत्यू

साताऱ्यात भाविकांची गाडी दरीत कोसळली; ३ भाविकांचा मृत्यू

गॅस टँकरला अपघात

साताऱ्यामध्ये भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. माण तालुक्यातील भोजलिंग देवस्थान डोंगराजवळ ही घटना घडली आहे. भाविकांना घेऊन जाणारी जीप २५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये ३ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ७ भाविक जखमी झाले आहेत. भोजलिंग देवस्थानाकडे देवदर्शनासाठी ते निघाले होते. अपघातामध्ये जीपचा चक्काचुरा झाला आहे. तर जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

First Published on: December 22, 2018 1:11 PM
Exit mobile version