‘त्या’ प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल

‘त्या’ प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चेंबूर इथे एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केल्याचे समजते. छगन भुजबळ यांच्यासह आणखी दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललितकुमार टेकचंदानी असे तक्रार देणाऱ्याचे नाव आहे. (case registered against chhagan bhujbal two others for threatening at chembur)

टेकचंदानी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, छगन भुजबळ यांना 2 व्हिडीओ पाठवले होते. त्यामध्ये भुजबळ यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. मात्र, व्हिडीओ पाठवल्यानंतर लगेच टेकचंदानी यांना धमक्या देणारे कॉल्स आणि मेसेज यायला लागले. त्यात शिवीगाळही केल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे. त्यानुसार, ‘मला आलेल्या मेसेजमध्ये तु भुजबळ साहेबांना मेसेज पाठवतो, तुझ्या घरी येऊन गोळ्या टाकतो. दुबईची लोकं लावतो. साहेबांना मेसेज करणे महागात पडेल’, असे त्यामध्ये म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांच्यासह 2 जणांविरोधात धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याच संदर्भातील व्हिडीओ पाठवल्यानंतर धमक्या देणारे कॉल आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादवि कलम 506 (2) आणि कलम 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर टेकचंदानी यांना हे मेसेज आणि कॉल कुणी केले याचा तपास केला जात आहे. टेकचंदानी यांनी त्यांना ज्या क्रमांकावरून मेसेज आणि कॉल आले त्याची माहिती पोलिसांना दिली आहे.


हेही वाचा – स्पिकर असतानाही मोदींनी नागरिकांशी माईक न घेता साधला थेट संवाद, कारण…

First Published on: October 1, 2022 12:09 PM
Exit mobile version