सीसीडीचे मालक सिद्धार्थ बेपत्ता

सीसीडीचे मालक सिद्धार्थ बेपत्ता

सीसीडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ

प्रसिद्ध कॅफे चेन CCD (कॅफे कॉफी डे)चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता आहेत. सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई आहेत. सिद्धार्थ सोमवारी कारने सक्लेश्पूर प्रवास करत होते, परंतु अचानक त्यांनी आपल्या ड्रायव्हरला मंगळुरूकडे वळण्याचे सांगितले आणि येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले.

मात्र बेपत्ता होण्यापूर्वी सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या कर्मचार्‍यांना उद्देशून पत्र लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रात त्यांनी त्यांच्या आर्थिक संघर्षाविषयी लिहिले असून आपले बिझनेस मॉडेल अपयशी ठरल्याचे नमूद केले आहे. सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळी जवळपास सहा वाजेच्या सुमारास नेत्रावती नदीच्या पुलाजवळ कारमधून उतरले. त्यांनी ड्रायव्हरला येतो असे सांगितले. ड्रायव्हरने दोन तास त्यांची वाट पाहिली; पण सिद्धार्थ परतले नाहीत. त्यांचा फोनदेखील बंद आहे

. त्यामुळे ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरी फोन करून ते बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम वेगाने सुरू केली आहे.भाजपा खासदार शोभा करंदलाजे यांनी गृहमंत्री अमित शाह यांना शोध घेण्यासाठी मदत मागितली आहे.

First Published on: July 31, 2019 6:05 AM
Exit mobile version