‘या’ दिग्गजांनी १ तासाच्या आत बजावला मतदानाचा हक्क

‘या’ दिग्गजांनी १ तासाच्या आत बजावला मतदानाचा हक्क

अभिनेत्री सुरुची अडाळकर

लोकसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला होत आहे. राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकसभा २०१९ मध्ये मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी मतदान केले असून काँग्रेसतर्फे माजी खासदार प्रिया दत्त यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवत आहेत. दरम्यान शिरूर लोकसभा निवडणूक उमेदवार अमोल कोल्हे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या विरोधात यांची लढत आहे. त्याचप्रमाणे वांद्रे पश्चिम येथून ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि देसी गर्ल म्हणून फेमस असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी देखील मतदान केले आहे. तर धीरूबाई अंबानींचे पुत्र आणि उद्योगपती असलेल्या अनिल अंबानी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून अभिनेते परेश रावल यांनी देखील आपल्या पत्नीसह आपल्या मतदान केले आहे.

राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार

राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण,ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि दक्षिण मुंबई अशा १७ मतदार संघांचा समावेश आहे. तर देशभरातल्या एकूण ९ राज्यांतल्या ७२ मतदारसंघांसाठी मतदान होत असून राज्यातला हा चौथा आणि शेवटचा टप्पा असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद राज्यात पणाला लावली होती. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.

First Published on: April 29, 2019 8:21 AM
Exit mobile version