लॉकडाऊन तोडणाऱ्यांवर कारवाई करा – केंद्राचे आदेश

लॉकडाऊन तोडणाऱ्यांवर कारवाई करा – केंद्राचे आदेश

lockdown

केंद्र सरकारने करोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारला नवे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शकांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. केंद्र सरकारने याबाबतचा एक अधिकृत आदेश जारी केला आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्रितपणे देशातील ८० जिल्हे बंद करण्याचा निर्णय़ घेतला आहे. ज्यामुळे येत्या ३१मार्चपर्यंत सर्वच ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती राहणार आहे. तर दिल्लीत आज सकाळी ६ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू झाले आहे. दिल्लीतल्या सर्व सीमा या कालावधीत बंद करण्यात येणार आहेत. पण त्याचवेळी अन्न, आरोग्य, वीज यासारख्या मुलभूत सेवा मात्र अविरत सुरू राहतील. तर दिल्लीतल्या २५ टक्के बसेस या अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू राहतील असे दिल्ली प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

करोनाचा वाढता प्रसार रोखला जावा म्हणूनच केंद्राकडून रविवारी मोठा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार देशभरातील प्रवासी रेल्वे वाहतूक तसेच मेट्रो आणि मोनोरेल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे देशभरातील तब्बल तीन हजार रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक ट्विट करत नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रत्येक राज्य सरकारने नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी ही नियमित आणि योग्यरीत्या केली जाईल याची खातरजमा करावी असे आदेश देण्यात आले आहेत. अनेक लोक अजुनही लॉकडाऊनची अंमलबजावणी ही गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वतःला सुरक्षित करतानाच तुमच्या कुटुंबाचेही संरक्षण करा. त्यासाठी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करा असेही आवाहन त्यांनी केले आहे.

First Published on: March 23, 2020 12:38 PM
Exit mobile version