करोनामुळे चार देशांचे व्हिजा निलंबित

करोनामुळे चार देशांचे व्हिजा निलंबित

व्हिसा प्रक्रिया

करोनाची दहशत संपूर्ण जगात पसरली असताना आता ४ देशांचा व्हिजा निलंबित करण्यात आला असून ३ मार्चपर्यंत ईराण, इटली, दक्षिण कोरिया, जपानमधून येणाऱ्या परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश करता येणार नाही. या देशांमध्ये अडकलेले नागरिक पुन्हा भारतात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवाय, अनेक लोकांना पुन्हा मायदेशी आणलं देखील गेलं आहे. पण, अजूनही बरेच नागरिक चीनमध्ये अडकले आहेत. पण, आता काही काळासाठी या देशातील चीनी नागरिकांचे व्हिजा रद्द करण्यात आले आहेत.

अन्य देशांसह आता भारतातही करोना पसरु लागल्यामुळे खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या सुचनेनुसार, ३ मार्चपर्यंत ईराण, इटली, दक्षिण कोरिया, जपानच्या नागरिकांचा व्हिजा किंवा ई व्हिजा निलंबित करण्यात आला आहे.  तसंच, जपान आणि दक्षिण कोरियाच्या नागरिकांना दिली जाणारी ‘व्हिजा ऑन अरायव्हल’ची सुविधाही रद्द करण्यात आली आहे.

चीनमध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील भारतात परत आणावं यासाठी संपर्क केला होता. त्यानुसार, तिथे अडकलेले अनेक नागरिक भारतात येण्यासाठी भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार,  ज्यांना भारतात प्रवेश करणं अत्यावश्यक आहे अशा लोकांनी आपल्या जवळच्या भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासशी संपर्क साधावा, असंही आवाहन करण्यात आलंय.

यापूर्वी चीनच्या नागरिकांचा ५ फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी जारी करण्यात आलेला व्हिजा निलंबित करण्यात आला आहे. तसंच, ज्या परदेशी नागरिकांनी चीन, ईराण, इटली, दक्षिण कोरिया किंवा जपानचा प्रवास १ फेब्रुवारी किंवा त्यानंतर केला असेल आणि ज्यांनी अद्याप भारतात प्रवेश केला नाही, त्यांचेही व्हिजा निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत जगभरात करोनामुळे ३ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

First Published on: March 3, 2020 8:32 PM
Exit mobile version