Mission Zero Scrap: एक पाऊल पुढे! मध्य रेल्वेला भंगाराच्या विल्हेवाटीतून ४४३.३५ कोटींचे उत्पन्न

Mission Zero Scrap: एक पाऊल पुढे! मध्य रेल्वेला भंगाराच्या विल्हेवाटीतून ४४३.३५ कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने “झिरो स्क्रॅप मिशन” सुरू केले. या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, वापर करण्यास अयोग्य डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे.

मध्य रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात फेब्रुवारी-२०२२ पर्यंत भंगारातून रु.४४३.३५ कोटी उत्पन्नाची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील उत्पन्नापेक्षा हे रु. १०६.५७ कोटी अधिक आहे जे ३१.६५% ने वाढले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील उत्पन्न रु.३३६.७८ कोटी होते.

श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी सांगितले की, भंगाराच्या विक्रीमुळे केवळ महसूल मिळत नाही तर परिसराची चांगली देखभालही होत आहे. त्यांनी असेही सांगितले की, रेल्वेमधील विविध ठिकाणी शोधण्यात आलेल्या सर्व भंगार साहित्याची मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये विक्री करेल. “झिरो स्क्रॅप मिशन” चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभाग आणि विविध डेपोंमध्ये भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे.


हेही वाचा : Ukraine Russia War: युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा राहुल गांधींनी व्हिडिओ केला पोस्ट, मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित


 

First Published on: February 28, 2022 9:21 PM
Exit mobile version