महानगरच्या वृत्तानंतर मध्य रेल्वे परत करणार चाकरमान्यांचे ४४० रुपये…

महानगरच्या वृत्तानंतर मध्य रेल्वे परत करणार चाकरमान्यांचे ४४० रुपये…

गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये ०११०७ एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सुपरफास्ट नसताना सुद्धा चाकरमान्यांकडून सुपरफास्टचा शुल्क आकारत असल्याची माहिती समोर आली होती. या संबंधीत वृत्त सर्वप्रथम दैनिक आपलं महानगरने प्रकाशित केले होते. ही बाब लक्षात येताच तत्काळ मध्य रेल्वेने या गाडीवरचा सुपरफास्ट शुल्क काढून घेतला होता. त्यानंतर प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या सुपरफास्टचा शुल्क परत मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी प्रवाशांचे पैसे परत करणार असल्याची माहिती दिली आहे.

एलटीटी-रत्नागिरी एक्स्प्रेस  

गणेशोत्सवाला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने १५ ऑगस्टपासून दररोज चार रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या चार गाड्यांपैकी, ०११०७ लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी ही गाडी सुपरफास्ट नसताना सुद्धा रेल्वेकडून प्रवाशांच्या तिकिटांवर सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येत होते. कोणतीही गाडी सुपरफास्ट शुल्क आकारण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान ५५ किमी प्रतितास इतका असणे आवश्यक असते. परंतु, ०११०७ लोकमान्य टिळक टर्मिनस- रत्नागिरी या गाडीचा सरासरी वेग फक्त ४४ किमी प्रतितास आहे. तरी सुद्धा प्रवाशांकडून चुकीचा सुपरफास्ट शुल्क आकरण्यात येत होता. रेल्वे नियमानुसार ज्या रेल्वे गाडीचा वेग ५५ किमी प्रतितास इतका असतो. त्या गाडीच्या एक्झिक्युटिव्ह एसी-१ कोच ७५ रुपये, एससी-२ कोच ४५ रुपये, एसी-३ ४५ रुपये, प्रथम श्रेणी ४५ रुपये, स्लिपर कोच ३० रुपये आणि व्दितीय श्रेणी १५ रुपये असा सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येतो. यासंबंधीत वृत्त दैनिक आपलं महानगरने प्रकाशित केले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने तत्काळ एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेसच्या रेल्वे तिकिटांवरील सुपरफास्ट शुल्क काढण्यात आले आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी सुपरफास्ट शुल्क देऊन या गाडीचे आरक्षण केले होते, त्यांचे पैसे आता परत मिळणार का? हा प्रश्न निर्माण झालेल्या होता.

२२ प्रवाशांकडून सुपरफास्ट शुल्क

मध्य रेल्वेने ही त्रुटी दूर करेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी या गाडीचे एकूण २२ प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले होते. त्या प्रत्येक प्रवाशांकडून प्रति तिकीटवर २० रुपये सुपरफास्टचा शुल्क आकारण्यात आला होता. २२ तिकिटांचे  ४४० रुपये अतिरिक्त वसूल करण्यात आले होते. प्रवाशांकडून घेण्यात आलेले हे पैसे परत देण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दैनिक आपलं महानगरने मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी दिली आहे.

First Published on: August 27, 2020 8:18 PM
Exit mobile version