चेन स्नॅचिंग बहाद्दर, ९० पेक्षा जास्त गुन्हे; कर्नाटकच्या चोराला भिवंडीत अटक

चेन स्नॅचिंग बहाद्दर, ९० पेक्षा जास्त गुन्हे; कर्नाटकच्या चोराला भिवंडीत अटक

भिवंडी – भिवंडी शहर व ग्रामीण भागात सोन साखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांकडून कसून तपास सुरू असतानाही या प्रकरणांना आळा घालण्यास पोलिसांना अपयश येत होतं. मात्र, नारपोली पोलिसांनी एका अट्टल आंतरराजीय चोरट्यास जेरबंद करीत त्याच्या ताब्यातून 1 लाख 2 हजार 600 रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

हेही वाचा फेसबुकवरील जाहिरातीला भुलली महिला अन् लागला १२ लाखांना चुना

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर रिक्षातून जाणाऱ्या समिक्षा सुनिल पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची चेन एका मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावली. या गुन्ह्याचा तपास करत असताना बाकर उर्फ बाबर अक्रम अल्ली, (39, राह. कर्नाटक) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले ५४ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याचे चेन हस्तगत करण्यात आली. तसेच अधिक तपास करता त्याने नारपोली पोलीस ठाण्यात दाखल दुसऱ्या गुन्ह्यातील ४८ हजार ६००रुपये किमतीची ९ ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहे.

हेही वाचा – मारहाण करून ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक

या सराईत चैन स्नाचिंग करणाऱ्या अट्टल आरोपीकडे तपास केला असता त्याच्याविरोधात महाराष्ट्रासह इतर राज्यात 90 पेक्षा जास्त जबरी चोरीचे, चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: November 11, 2022 8:11 PM
Exit mobile version