महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी जयप्रकाश छाजेड, राजाराम पानगव्हाणे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी जयप्रकाश छाजेड, राजाराम पानगव्हाणे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पदाधिकारी राजाराम पानगव्हाणे यांची गुरुवारी (दि.२६) नियुक्ती करण्यात आली. तर, सरचिटणीसपदी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती केली गेली. प्रदेश कमिटीवर एकाच वेळी नाशिकच्या चारही अनुभवी पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने स्थानिक पातळीवरही काँग्रेसला ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी राज्य कार्यकारिणीतील फेरबदलासह नियुक्तीची घोषणा केली. तसे पत्रही नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. आज झालेल्या निर्णयानुसार राज्यभरातून १८ उपाध्यक्ष, १ खजिनदार, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सेक्रेटरी, ६ प्रवक्त्यांची निवड करण्यात आली. याशिवाय एक्झिक्युटिव्ह कमिटीत १४, एक्स-ऑफिशिओ मेंबर्स ऑफ एक्झिक्युटिव्ह कमिटीत ७, डिसिप्लिनरी अॅक्शन कमिटीत ५ पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली.

या जिल्ह्यात अध्यक्षांची निवड

भिवंडी  – राशीद मोमिन
रायगड – महेंद्र घरत
उल्हासनगर – रोहित साळवे
सोलापूर – धवलसिंह मोहीते-पाटील
सांगली – विक्रमसिंह सावंत
जळगाव – श्यामकांत तायडे
वाशीम – अमित झनक
अकोले – अशोक अमनकर
बीड – राजेसाहेब देशमुख
बुलढाणा – राहूल बोंद्रे
पुणे – रमेश बागवे
ठाणे – दयानंद छोरघे
मीरा भाईंदर – प्रमोद सामंत
सिंधुदुर्ग – चंद्रकांत (बाळा) गावडे

 

First Published on: August 26, 2021 11:31 PM
Exit mobile version