संजय राऊत अमेरिकेचीही निवडणूक लढवतील, चंद्रकांत पाटील यांचा टोला

संजय राऊत अमेरिकेचीही निवडणूक लढवतील, चंद्रकांत पाटील यांचा टोला

संजय राऊत अमेरिकेचीही निवडणूक लढवतील, चंद्रकांत पाटील यांचा टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर भाजप-मनसे युतीबाबत प्रस्ताव नसल्याचे सांगत युतीच्या चर्चांवर पुर्णविराम दिला आहे. तर संजय राऊतांना आगामी महापालिका निवडणुकीमध्ये लढण्याचे चॅलेंज दिले आहे. शिवसेनेची मुंबईत ताकद असेल तर संजय राऊत यांनी मुंबईतील एका सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी असे थेच आव्हान चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना दिलं आहे. तसेच संजय राऊत अमेरिकेचीही निवडणूक लढवतील असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी भाजप – मनसे युती करुन दाखवावी असे म्हटलं आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे. “जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर, मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेची मुंबईत तर ताकद उरली असेल तर एक सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी असं चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. मराठीत म्हण आहे.. दंड थोपटणे, संजय राऊतांनी दंड चेक करावा आणि आपली क्षमताही तपासावी असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर टीका करत म्हटलंय की, संजय राऊत अमेरिकेचीही निवडणूक लढवतील, असं बोलताच एकच हशा पिकला होता.

युतीबाबत कोणताही प्रस्ताव नाही

मनसेची परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलल्या शिवाय आम्ही युतीसंदर्भात चर्चाही करु शकत नाही, हे अगोदरच स्पष्ट केलेलं आहे. राज ठाकरेंनी मला त्याच्या भाषणाची एक क्लिप मला पाठवली होती. ते उत्तर भारतीयांसमोर केलेलं भाषण उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप व्हायरल झालं आणि ते ऐका अंस त्यांनी सांगतल्याने मी ते ऐकलं, ते ऐकल्यानंतर माझ्या मनात काही मुद्दे होते. ते मुद्दे घेऊन आमच्यात चर्चा झाली. त्यामुळे सदिच्छा भेट, राजकीय चर्चा असेल तर युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकासंदर्भातील राजकीय चर्चा झाली, यामुळे सध्या तरी युतीबाबत कोणताही प्रस्ताव नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

First Published on: August 6, 2021 1:56 PM
Exit mobile version