माणूस कितीही मोठा झाला तरी…, चंद्रकांत पाटलांनी केला रिक्षातून प्रवास

माणूस कितीही मोठा झाला तरी…, चंद्रकांत पाटलांनी केला रिक्षातून प्रवास

राज्याच्या राजकारणात सध्या रिक्षाला फार महत्त्वं आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचा उदरनिर्वाह रिक्षावरच होता. त्यातच, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही आज रिक्षाने प्रवास केला. या प्रवासाचा व्हिडीओ पाटलांनी ट्विटरद्वारे शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत ,”आपण सर्वजण आज माझ्यावर भरभरून प्रेम करताय; पण माणूस कितीही मोठा झाला तरी आपली मुळं त्याला विसरता येत नाहीत. मीही एका गिरणी कामगाराच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. आज बऱ्याच काळानंतर रिक्षातून प्रवास करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला”, असं ट्विट केलं आहे. या व्हिडीओमध्ये ते एका रिक्षामध्ये बसले आहेत. यावेळी ते लोकांचं हस्तांदोलन करत अभिवादन केले.


भाजपच्या कार्यकारिणीत खांदेपालट

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील होते, मात्र आता नव्या नियुक्तीनुसार प्रदेशाध्यक्ष पदाचा भार चंद्रकांत बावनकुळे यांना देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने ब्राह्मणी चेहरा पक्षाचा राहू नये याची दक्षता भाजपाने घेतली आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कालच नाराजी व्यक्त केली होती. त्यावरूनच पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि आता राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपावर शरसंधान केले होते. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. आता बावनकुळे यांची नियुक्ती करून टीकाकारांना चोख उत्तर भाजपाने दिले आहे.

 

First Published on: August 12, 2022 8:34 PM
Exit mobile version