एसटीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर; अजिंठा लेणी पर्यटनासाठीच्या वातानुकूलित बस धुळखात

एसटीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर; अजिंठा लेणी पर्यटनासाठीच्या वातानुकूलित बस धुळखात

छ. संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे वातानुकुलीत युरो टू इंजीन ह्या बसेस गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांची मुदत संपली आहे. अशा बसेस आज रोजी सोयगाव आगारात धूळ खात पडल्या आहेत. मात्र, सोयगाव आगारातील शिवशाही दोन बसेस व एशीयाड बस ह्या डिझेलवर चालणार्‍या असून मोठ्या प्रमाणात धूर सोडत चालतात त्या बसेस रस्त्यावर धावत असताना अचानक बंद पडतात. अशा बसेस लेणी टी पॉईंट बस स्टॉपपासून ते लेणीच्या आतपर्यंत सुसाट वेगाने धावतात.

अजिंठा बुद्ध लेणी पाहण्यासाठी देश, विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. जपान, थायलंड, श्रीलंका, व्हिएतनाम या देशांतील बौद्ध धम्म गुरु यांना लेणीमध्ये जाण्यासाठी धूर फेकणारी अस्वच्छ बसेस ज्या पूर्णपणे गुटखा खाऊन पिचकार्‍या मारुन सीटे मोठ्या प्रमाणात अस्वच्छ असून मोठी धूळ तर कधी बसमध्ये जाळेच जाळे, कधी बसची पायरी चढताना त्याचे पत्रे वर निघालेले असतात. अशा बसमधून देशविदेशातील पर्यटकांना 4 किलोमीटर प्रवास करावा लागतो. बस बद्दल नेहमीच तक्रारी असतात. या सर्व तक्रारींची माहिती सोयगाव आगारप्रमुखांशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिले असता ते नेहमीच या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून आलेले आहेत. गेल्या आठवड्यात थायलंड देशातील एक ग्रुप लेणी बघून बसमध्ये बौद्ध धम्मगुरु भन्तेजी हे तिकीट काढून बसमध्ये चढले. मात्र बसमध्ये एका पर्यटकाने उलटी केलेली असल्यामुळे ते भन्तेजी ताबडतोब बसमधून खाली उतरले व वाहक मिसाळ यांना या प्रकाराबद्दल त्यांच्या सोबत असलेले गाईड ज्यांनी थायलंड भाषेचे ट्रान्सलेशन करून हिंदीमध्ये “बसमध्ये किती घाण वास येत आहे, बस किती अस्वच्छ आहे” आम्ही थायलंडवरून भारत देशात आलो.

अजिंठा लेणी ही जगात प्रसिद्ध आहे. तुम्ही या खटारा बस चालवून लेणीचे नाव खराब करत आहेत असे शब्द बोलून सुनावले. तेव्हाच एका बौद्ध तरुण मुलाने त्या भन्तेजींची व्हिडीओ शूटिंग केली तेव्हा चालक, वाहक यांनी सारवासारव करत लेणी टी पॉईंट बस स्थानक येथे फोन करून ताबडतोब त्यांना शिवशाही बसमध्ये बसण्याचा आग्रह केला. जि-20 परिषद मोठ्या थाटात औरंगाबाद येथे संपन्न झाली. 150 देशातील पाहुणे यांना पुणे येथून वातानुकूलीत बस मागवण्यात आल्या. मात्र जगप्रसिद्ध अजिंठा बुद्धलेणी कडे जाणून दुर्लक्ष करुन जाणून बुजून जि- 20 मधून अजिंठा बुद्ध लेणीला वगळण्यात आले.

First Published on: March 7, 2023 1:10 PM
Exit mobile version