उद्धव ठाकरे हे दगाबाज, विक्षिप्त, खोटारडे; नारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात

उद्धव ठाकरे हे दगाबाज, विक्षिप्त, खोटारडे; नारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Narayan Rane Attacks on Uddhav Thackeray

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटले होते. त्यावरुन राणे यांनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. ठाकरे हे महाफडतूस आहेत. दगाबाज, विक्षिप्त आणि खोटारडे असा हा माणूस आहे, असे टीकास्त्र नारायण राणे यांनी ठाकरेंवर डागले आहे. Cheater freaks liars BJP leader Narayan Rane s attacks Uddhav Thackeray pup

मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात अडीच तास ते मंत्रालयात गेल नाहीत. गुंडगिरी का संपवली नाही. तेव्हा घरात बसून राहिले आणि आता बायकोला घेऊन कोणालाही भेटायला जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वत: काहीही करु शकत नाही, असेही राणे म्हणाले.

ज्या देवेंद्र फडणवीस यांना हे फडतूस म्हणत आहेत. त्या देवेंद्र फडणवीस यांच्यातील कोणतेही गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही म्हणत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार असताना कायदा सुव्यवसअथा निर्माण झाले होते, त्याचे काय म्हणत राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

नारायण राणे यांनी यावेळेला सुशांत सिंग यांना का मारलं? त्याची आत्महत्या नव्हती. ती हत्या होती, असा आरोपही राणे यांनी केला आहे. याशिवाय दिशा सालियानला का मारलं? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे असेही राणे म्हणाले.

सचिन वाझे हा गुन्हेगार होता. तरीही त्याला कामावर घेऊन महत्त्वाचे खाते दिले. सचिन वाझे उद्धव ठाकरे यांचे जावई आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. गुन्हेगारांना मदत करणारी व्यक्ती मुख्यमंक्षी होते हेच महाराष्ट्रासाठी कलंक असल्याचे राणे म्हणाले.

( हेही वाचा: ‘सामना’ सारखे वृत्तपत्र महाराष्ट्रात बंद केले पाहिजे, ठाकरी भाषेवरुन नारायण राणे आक्रमक )

आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप 

नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही यावेळी आरोप केले आहेत. राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी कोरोना काळात जितके टेंडर पास केले त्यातले 15 टक्के त्यांनी घेतले. कोरोना काळात यांनी आपलं घर भरण्याचं काम केलं.

भाजपच्या कार्यकर्त्यांना यापुढे जर वाकंड तिकडं बोलालं तर फडतूस काय असंत ते दाखवून देऊ, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला. उद्धव ठाकरे हे सगळं करुनही तुरुंगाबाहेर यासाठी आहेत कारण ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. नाहीतर कधीच बाहेर राहिले नसते, असे म्हणत राणे यांनी ठाकरेंवर घणाघात केला आहे.

ठाकरे हे केवळ सपोर्टिंग पार्ट

राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस हे उद्धव ठाकरे यांनी केवळ एक सपोर्टिंग पार्ट म्हणून ठेवतात. ते पुन्हा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. विशिष्ट प्रकारची खुर्ची नेतात. कारण यांना बसताही येत नाही. लोकांना वाटतं त्यांना सिंहासन दिलं जातं. पण प्रत्यक्ष गोष्ट वेगळी आहे.

First Published on: April 5, 2023 4:27 PM
Exit mobile version